बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: वैराग (ता.बार्शी) येथील विद्यामंदिर प्रशालेतील कर्मचार्‍याचा त्याच्या पत्नीनेच गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. मयताच्या शवविच्छेदन अहवालानंतर त्याची आत्महत्या नसून गळा दाबल्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
       बन्सी गुरुदास चव्हाण (वय ५५) रा.वैराग असे यातील मयताचे नाव असून गंगूबाई (वय ५०) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. वैद्यकिय अहवालानंतर वैराग पोलिसांनी गंगूबाई हिस अटक करुन बार्शी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायदंडाधिकारी व्ही.बी.मुल्ला यांनी पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  दारुच्या नशेत आपल्या पतीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचे गंगूबाई हिने वैराग पोलिसांना सांगीतले होते. मयताचे शवविच्छेदन करण्यात आले होत यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले आहे. दारु पिण्याच्या कारणावरुन गंगूबाई व बन्सी यांच्यात सतत भांडणे होत होती त्यामुळे ते दोघे विभक्त रहात असत. गुरुवारी पहाटे बन्सीच्या घरात येऊन गंगूबाईने बन्सीचा गळा आवळून खून केला व अंगावर रॉकेल टाकून पेटविल्याचा प्रकार उघड झाला आहे. घटनेचा अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे हे करीत आहेत.
 
Top