बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शिवसेनाप्रमुखाच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याच विचारांवर आधारित जेष्ठ शिवसैनिक राजेंद्र मिरगणे यांचे सामाजिक सेवाकार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार विधान परिषदेचे गटनेते दिवाकर रावते यांनी काढले.
    आर.एस.एम.समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या जाहिर नागरी सत्कारात ते बोलत होते. यावेळी सत्कारमुर्ती राजेंद्र मिरगणे, सुप्रसिध्द अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, आ.ज्ञानराज चौघुले, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, धाराशिव उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील, माजी आ.ज्ञानेश्‍वर पाटील,धाराशिव जिल्हा परिषद गटनेते दत्तात्रय साळुंके,माजी खासदार शिवाजी कांबळे,धाराशिव महिला जिल्हा प्रमुख शामल वडणे, पतंजली योग पिठाच्या दक्षिण भारत प्रमुख सौ. सुधा अळ्ळीमोरे, माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,युवा सेना जिल्हा उपप्रमुख किरण गायकवाड, तालुका प्रमुख काका गायकवाड,भाजपा जिल्हा उपप्रमुख धनंजय जाधव,महिला तालुका प्रमुख सौ.मंगल पाटील आदी मान्यवर यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.
    हजारो बार्शीकरांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राजेंद्र मिरगणे यांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य पुष्पहार शाल,ङ्गे टा व तलवार देवून व केक कापून जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी रावते यांनी, पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशामुळेच मिरगणे यांच्या समाजकारणाची दखल घेवून या कार्यक्रमास आलो असे सांगत मिरगणे यांनी केलेले कार्य लोकोपयोगी आहे. शिवसेना प्रमुखांच्या विचारांची निष्ठा त्यांनी जोपासली.तसेच राज्यातील कॉग्रेस -राष्ट्रवादी सरकार च्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष होता.त्यांच्या कारभाराबद्दलची चीड जनतेने व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांचे शासन देशाचे उज्वल भविष्य घडवेल असा विश्‍वास व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष आता महायुतीच्या सत्तेमुळे भरुन निघेल. शिवसेनेशी पदापुरती जवळीक पालकमंत्री दिलीप सोपल यांनी युतीसरकारच्या काळामध्ये केली. त्यांनी विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी बार्शीच्या विकासकामाना खिळ घातली. त्यांना फक्त सत्ता पाहिजे अशी टिका त्यांनी केली.
    यावेळी बोलताना डॉ.कोल्हे यांनी धाराशिव लोकसभा मतदार संघामध्ये बार्शी तालुक्यात महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळाले. शिवसेनेशी प्रामाणिक राहणार्‍या शिवसैनीकाची पक्षामध्ये कधीच अवहेलना होत नाही. सच्चा शिवसैनीकाला न्याय देण्याचे पक्षप्रमुखांचे धोरण आहे. मात्र सत्तेसाठी कोलांटउडी मारणार्‍यांना सेनेत थारा नाही. असे परखड उदगार काढले. यावेळी सत्काराला उत्तर देताना मिरगणे यांनी कोणतेही पद नसताना माझ्यावर बार्शीकरांनी दाखविलेले प्रेम पाहून भारावुन गेलो आहे. बार्शीकरांचे अलोट प्रेम हेच माझ्या आयुष्याचे संचीत आहे. निरपेक्ष भावनेने लोकसेवा कार्य कायमस्वरुपी सुरु राहील. मला शिवसेना प्रमुखांचे विचार नेहमीच प्रेरणा देतात. त्यांचा मला सहवास लाभला. त्यामुळे मी शिवसेनेशी कायमची बांधीलकी पत्करली आहे. पक्ष प्रमुखांचे आर्शीवाद माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे खंबीरपणे वाटचाल सुरु राहील असे सांगितले. यावेळी बोलताना सुधा अळ्ळीमोरे यांनी रामदेवबाबांचे विचार आदर्श मानुन मिरगणे कार्य करत आहेत. बार्शी योग शिबीर आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, भाजपा जिल्हा उपप्रमुख धनंजय जाधव पवार, युवा सेना जिल्हा उपप्रमुख किरण गायकवाड, प्रा.संगमेश्‍वर भडुळे,शिवाजी पवार,विनय सारंग यांनीही समयोचित भाषणे केली. सुत्रसंचालन श्‍वेता हुल्ले व एन.आर.कुलकर्णी यांनी केले. विनय सारंग यांनी आभार मानले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरएसएम समाजसेवा संस्थेचे समन्वयक नानासाहेब कदम, शिरीष घळके, मदन गव्हाने, बिभिषण पाटील, माजी नगरसेवक सुनिल चौगुले, बाळासाहेब पवार, डॉ. विलास लाडे, अविनाश शिंदे, संभाजी आगलावे, पंडीत मिरगणे, अविनाश पोकळे, दत्तात्रय जाधव, दिनेश गवळी, दिनेश अनपट यांनी परिश्रम घेतले.
 
Top