बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: इंडियन रेड क्रॉस सोसायटी, राज्य शाखा मुंबई च्या वतीने बार्शी रेड क्रॉस येथे ३ दिवसीय प्रथोमपचार शिबीराचे आयोजन केले आहे.दि. २३ मे ते २५ मे या दरम्यान होत असलेल्या शिबीराचे उद्घाटन तहसीलदार बालाजी सोमवंशी व पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रेड क्रॉस बार्शीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, सहसचिव सुभाष जवळेकर,खजिनदार रामेश्वर लढ्ढा,प्रा.दिलीप कराड, प्रा.कल्याण घळके,डॉ.भरत गायकवाड,अशोक ढाळे,प्रतापराव जगदाळे,संतोष सुर्यवंशी,पत्रकार अरुण बळप आणि तसेच मुंबई खास प्रशिक्षण देण्यासाठी भरत जोईल व डॉ.विकास कुरणे आदि उपस्थित होते. या वेळी बोलताना तहसीलदार सोमवंशी म्हणाले की अनेक वेळा आपतकालीन व संकटकाळात एखादी ेदूर्घटना घडली या वेळी अनेक जखमी प्रथोमपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागतो. त्यामुळे अशा प्रथोमउपचार प्रशिक्षण उपचाराची गरज आहे. यामुळे अशा प्रशिक्षणार्थी निर्माण झाल्यामुळे अनेक जखंमीचा जीव वाचवण्यास मदत होणार आहे.
या शिबीरामध्ये विद्यार्थी ,नर्स,मिल इंडस्ट्रीयल प्रभागातून सुमारे ३५ व्यक्तीनी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.आपतकालीन व्यवस्थेमध्ये दुर्घटने मध्ये जखमीना कशा प्रकारे प्रथोमपचार करावा प्रथोमचार म्हणजे काय त्याचा जखमीना होणार लाभ काय बॅन्डेज चे विविध प्रकार ते कशा रितीने वापरावे. बेशूध्द अवस्थेत किंवा पाण्यात बुडालेल्या व्यक्तीना प्रथोमपचार कसा द्यावा, तेसच विषबाधा झाली असेल तर त्याचा प्रथोमपचार कसा करावा. सह विविध प्रकारचे प्रात्यक्षिक या शिबीरामध्ये शिकवले जाणार आहे. या साठी लागणारे सर्व साहित्य मुंबई रेड क्रॉस तर्फे देण्यात आलेले आहे. या ३ दिवसीय चालणार्या प्रथोमचार प्रशिक्षण शिबीरात या विद्यार्थीची परिक्षा होणार असून पास होणार्या विद्यार्थीना महाराष्ट्र राज्य रेड क्रॉस च्या वतीने व दिल्ली हेड कॉर्टर च्या वतीने सन्मान पत्र देण्यात येणार आहे.
या वेळी सूत्र संचालन कुंकूलोळ यांनी केले तर आभार प्रतापराव जगदाळे यांनी मानले.