बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- घाणेगाव (ता.बार्शी) येथील एका तरुणाने आपल्या सख्ख्या भावाच्या बायकोशीच अनैतिक संबधासाठी जवळीक साधली, यानंतर तिच्या डोक्यात दगडी पाटा खालून खून केला व स्वत:लाही संपवण्यासाठी विषारी औषध प्राषण केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण यातून बचावला असून बार्शीतील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ब्रह्मदेव नेटके असे त्या तरुणाचे नांव असून मयत मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरोधात वैराग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. मंगळवार दि.२० रोजी रात्री त्यांच्या राहत्या घरी सदरची घटना घडली असून काही दिवसांपासून सुरु असलेल्या अनैतिक शारिरीक संबंधांनंतर त्यांच्यात मतभेद झाले. कामधंद्यासाठी गाव सोडून जातो असे तो सांगत असतांना तिने आपल्यासोबत घेऊन जाण्याचा आग्रह केला व तुझ्याशिवाय मला जगायचे नाही मी मरणार असे तिने वेळोवेळी म्हटल्याचे आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या तरुणाने म्हटले आहे. घरात कोणी नसतांना टिव्ही पहात असतांना तिने त्याच्याशी पुन्हा सलगी करुन त्याला शरीरसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्यावर गावात होत असलेल्या अनैतिक संबंधाच्या चर्चेचा राग आल्याने त्यांच्यात वाद झाला होता, यावेळी रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगडी पाटा घातल्याचे व स्वत:ला संपविण्यासाठी विषारी औषध प्राषण केल्याचे यातील आरोपी ब्रह्मदेव नेटके याने म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास सहा.पो.नि.राजेंद्र टाकणे हे करीत आहेत.