बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : हौस मौज आणि अनावश्यक खर्चाला फाटा देऊन रुई (ता.बार्शी) येथील वधूपित्याने मुलीच्या विवाहात एकहजार एक वृक्षांची रोपे देऊन अनोखा विवाह पार पाडला. औदुंबर सुखदेव भोसले असे वधूपित्याचे नांव आहे. निसर्गाचा समतोल ही काळाची गरज ओळखून स्वत:पासून बदलाची सुरुवात करत सुमारे दोन लाख रुपये किमतीची अकरा प्रकारच्या वृक्षांची रोपे भोसले यांनी जावयास देत कन्यादान केले.
या विवाह सोहळ्यासाठी राजकिय, शैक्षणिक, साहित्य, कृषि, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरील लावली. औदुंबर भोसले यांचे एकत्र कुटूंब असून मागील वीस पंचवीस वर्षांपासून पुणे येथे स्थायीक झाले. शहरातील वाढते प्रदुषण याची चिंता सतावत असतांनाच पुणे येथील सुनिल महाजन यांनी भोसले यांना नैसर्गिक झिरो बजेट शेतीचे मार्गदर्शन केले. मुलीलाही त्यांनी कृषि पदविकाचे शिक्षण दिले. शेती करणाराच जोडीदार असावा म्हणून वर संशोधन करतांना शेतकरी कुटूंबातील कष्ट करणार्या तरुणाची निवड केली. रुई येथील बाळासाहेब चाबुकस्वार यांचे पुत्र बालाजी यांच्याबरोबर स्नेहल या मुलीचा विवाह लावला. शनिवारी दि.१७ रोजी रुई येथील प्राथमिक शाळेच्या आवारातच हा आगळवेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. रुखवतामध्ये पुणे येथील नर्सरीतून आणलेल्या नारळ, फणस, आंबा, चिक्कू, संत्री, मोसंबी, जांभूळ, सिताफळ, रामफळ, लिंबू, पेरु आदी अकरा प्रकारच्या वृक्षांची रोपे होती. विवाहासाठी आलेल्या नातेवाईकांचा सन्मानदेखिल याच वृक्षांची रोपे देऊन करण्यात आला. पर्यावरणाचा र्हास थांबवा, वृक्षारोपण करा, संवर्धन करा असा संदेश देत विवाहातील अनावश्यक डॉल्बी, बँड यांच्या खर्चाला बगल देण्यात आली. युवा शेतकर्यांनी पुढे येऊन वृक्षांची जोपासणा करावी, सामुदायिक विवाहाची चळवळ उभी करावी असे सांगत सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीच्या प्रयोगातून मुलीच्या विवाह समारंभात वृक्षाची रोपे देत असल्याचे भोसले यांनी सांगीतले. या विवाह सोहळ्याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र राऊत, लक्ष्मण संकपाळ, प्रा.हरिश्चंद्र भोसले, काकासाहेब कोरके, राहुल भड, वैभव शिंदे, सुरेश घोडके, राजाभाऊ घोडके, सुनिल पाटील, केरबा मोटे, साहेबराव गुंड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.