बार्शी -: हॉटेलमध्ये वैयक्तिक भांडणे करु न दिल्याने, राग मनात धरुन हॉटेलची तोडफोड करण्यात आली. यावेळी एकजण गंभीर जखमी झाला, यानंतर रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याबाबत बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताडसौंदणे रस्त्यावरील वैष्णवी पॅलेस असे या हॉटेलचे नाव असून सोमवारी दुपारी सोन्या गायकवाड यास का मारहाण करु दिली नाही व त्यास हॉटेलमध्ये आसरा देत लपवून का ठेवले व आमची भांडणे का सोडवली असे म्हणत यातील आरोपींनी हॉटेलची तोडफोड केली.
हॉटेलचे मालक पृथ्वीराज रजपूत यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन कुणाल उत्तम खंदारे, दादा मुलाणी, संदिप शेंडगे, नाथा मोहिते, लखन अवघडे यांच्यासह चार ते पाच अज्ञातांविरोधात बार्शी पोलिसांत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.
लाकडी, काठी, खोर्या टिकावचे दांडके व दगड घेऊन हॉटेलमध्ये नासधूस करण्यात आली. काही वेळानंतर टेंपो क्र.एम.एच.१३ ४४३०, , एम.एच.१४ ६१७०, सुमो क्र.एम.एच.४५००, एम.एच.१३ एफ ९०३५, सदरच्या घटनेत जवळपास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेचा पुढील तपास पो.हवालदार सुनिल बनसोडे हे करीत आहेत.