बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील आनंदयात्री प्रतिष्ठान व नटराज डान्स अकॅडमीच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत नृत्य शिबीराचा समारोप करण्यात आला. यामध्ये २८२ प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
    सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी उन्हाळा सुटीमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने सलग दुसर्‍या वर्षी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. समारोपाच्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
    शिबीरातील प्रशिक्षणार्थींनी यावेळी मराठी-हिंदी गीतांचे सादरीकरण केले. शिबीर यशस्वीतेसाठी जमीर कुरेशी, शंकर अंकुश, रामचंद्र इकारे, कृष्णा उपळकर, विलास मुंढे, शाम कळसे, उमेश अक्कलकोटे, अक्षय कोठारी आदींनी परिश्रम घेतले.
 
Top