उस्मानाबाद :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातंर्गत  जिल्ह्यातील  खालील मागासवर्गीय मुला/ मुलींचे  शासकीय वसतिगृहाची 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी  प्रवेश प्रक्रिया 1 मे पासून ऑनलाईन सुरु झाली असून मागासवर्गीय मुला/ मुलींनी प्रवेशासाठी संबंधित वसतिगृहाच्या गृहपाल यांच्याशी संपर्क साधुन विहीत कालावधीत  प्रवेश अर्ज भरावेत. वसतिगृह प्रवेश ऑन लाईन प्रवेश अर्ज मुदतीतच सादर करावेत, असे आवाहन अनिल शेंदारकर, सहायक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांनी केले आहे.
        शालेय विभागातील विद्यार्थ्यांनी 15 मे पुर्वी किंवा निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत व महाविद्यालयीन विभागातील विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत ऑनलाईन प्रवेश फॉर्म करणे आवश्चक आहे. वसतीगृहात रिक्त जागेवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची  निवड ही  शासनाने ठरवून दिलेल्या जातीच्या, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या निकषानुसार केली  आणार आहे.
       निवड झालेल्या विद्यार्थ्यांची विना मुल्य राहण्याची, भोजनाची उत्तम सुविधा करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रतिमहा रुपये 500 रुपये व जिल्हास्तरावर वसतीगृहास रुपये 600/- रुपये प्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येते. अनुज्ञेय विद्यार्थीनीस स्वच्छतेसाठी  प्रतिमहा रुपये 100 दिले जाणार असून वसतीगृहात कॉट, गादी, बेडींग साहित्य आदि सुविधा पुरविण्यात येणार आहे. वसतिगृहात वाचनालयाचे मौल्यवान, दुर्मिळ पुस्तके विद्यर्थ्याना पुरविले जाणार असून यात संगणकाची सुविधा पण उपलब्ध आहे.
       प्रवेशासाठी प्रवेश पात्रता पुढीलप्रमाणे आहे. शालेय विभागासाठी  इयत्ता 7 वी उत्तीर्ण व महाविद्यालय विभागासाठी  इयत्ता 10 वी , 12 वी व पदवी उत्तीर्ण असावा, तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती/ जमाती/ विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग/ इतर मागास प्रवर्ग, किंवा आर्थीकदृष्टया मागासलेल्या प्रवर्गातील असावा/ विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अनुसूचित जातीसाठी रुपये 2 लाख व अन्य मागास प्रवर्गासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख असावे.
      उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, एल. आय. सी. आफीस तुळजापूर रोड, उस्मानाबाद आणि मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वसतिगृह- आर. पी. कॉलेजच्या पाठीमागे, उस्मानाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, तुळजापूर, शिंदे हायस्कुलच्या शेजारी, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वसतिगृह, तुळजपूर, एस. टी. कॉलनी-सैनिकी शाळेच्या समेार, तुळजापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, नळदुर्ग- कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या पाठीमागे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, लोहारा, सलगरा (दि). रोड, लोहारा, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय (मुलींचे) शासकीय वसतिगृह, बालाजीनगर-उमरगा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह, कळंब, पंचायत समितीच्याशेजारी, मागासवीर्गय व आर्थिकदृष्या मागासवर्गीय (मुलींचे )  वसतीगृह, वाशी, जुने एस. टी. स्टॅन्डजवळ-वाशी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वसतिगृह करमाळा रोड, आय. टी. आय. शेजारी, परंडा
 
Top