उस्मानाबाद :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणारी एमएच-सीईटी परीक्षा गुरुवार, दि. 8 मे,2014 रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे. या परीक्षेसाठी 1 हजार 559 विद्यार्थी बसणार असल्याची माहिती या परीक्षा आयोजन समितीचे जिल्हा संपर्क अधिकारी डॉ. एन.एस. गंगासाखरे यांनी दिली आहे.
प्रवेश परीक्षा जिल्हयातील 4 शाळा / महाविद्यालयाची परीक्षा केंद्र म्हणून निवड करण्यात आली असून विद्यार्थ्याना अॅडमीट कार्ड प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mhcet2014.co.in या सकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर 144 कलम 8 मे रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जारी करण्यात आले असून या कलमानुसार दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावाला परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात झेरॉक्स यंत्र, इंटरनेट सुविधा व व दुरध्वनी केंद्र बंद राहतील. परीक्षा केंद्रांत परीक्षार्थी विद्यार्थ्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस प्रवेश देण्यात येणार नाही किंवा परीक्षा संपेपर्यत कोणत्याही विद्यार्थ्यांस केंद्र सोडुन बाहेर जाता येणार नाही.
परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, पेजर, लॅपटॉप, कॅलक्युलेटर आदि नेण्यास सक्त मनाई करण्यात आली असून केंद्रात विद्यार्थ्यांना फक्त काळे बॉलपॉईट पेन,अॅडमिट कार्ड, रिसिप्ट -कम-आयडेंटीटी कार्ड नेता येतील. विद्यार्थ्यांना लॉग टेबल प्रश्नपत्रिकेसोबत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या परिक्षेचा निकाल 14 जुन पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. या प्रवेश परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांकडून प्रेफरन्स फॉर्म भरुन त्यांची आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल. वैद्यकिय आणि दंत अभ्यासक्रमासाठी केंद्रीय परिषदेने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे 30 सप्टेंबर,2014 ही प्रवेशाची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. या तारखेनंतर वैद्यकिय व दंत अभ्यासक्रमासाठी कोणतेही प्रवेश केले जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी,असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.