बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- बार्शी शहराचा भौगोलिक विकास, लोकसंख्या, दरडोई उत्पन्न, पाण्यासह इतर सोयी सुविधांचा दर्जा सुमार असला तरी बार्शी आगाराच्या बस वाहनांतून प्रवास करतांना मात्र प्रवाशांना दर्जाहिन वाहनांचा अनुभव अनेक वेळा मिळतो. विभागातील प्रथम क्रमांकाचे उत्पन्न मिळविलेल्या बार्शी बस आगाराचे कौतुक झाले असले तरी प्रवाशांना देण्यात येणार्‍या सुविधा, स्वच्छता, वाहनाची दुरावस्था, बसस्थानकांतील अनेक गैरप्रकार यातून बार्शी बस आगार व्यवस्थेची मान खाली जाते. 
        या दैनंदिन फेरीच्या वाहनाच्या काही काचा अनेक वर्षांपासून फुटलेल्या आहेत. ग्रामस्थांना आपल्या गावाला जाण्यासाठी या वाहनाशिवाय पर्याय नसल्याने नाईलाजास्तव ठरलेली तिकीटांची रक्कम भरुन प्रवास करावा लागतो. या वाहनातून प्रवास करणारे प्रवाशी कारीहून बार्शीकडे येत होते यावेळी वादळ वारे व पावसामुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. प्रवाशी काय वाहन चालकाच्या समोरची देखिल काच नसल्याने वाहन चालकाला अत्यंत सावकास वाहन चालविणे भाग पडले. केवळ २० कि.मी.पर्यंत प्रवास असलेल्या वाहनास कमी वेगाने यावे लागल्याने सव्वादोन तासांचा अवधी लागल्याचे प्रवाश्यांनी सांगीतले. संपूर्ण प्रवासात प्रवाशी आणि वाहक चालक यांच्यात शब्द सुमणांचे संभाषण झाले. बार्शीत आल्याबरोबर प्रवाश्यांनी आगार व्यवस्थापकांकडे येऊन मोठा गोंधळ केला. यावेळी व्यवस्थापकांनी हात जोडून प्रवाशांची माफी मागून यापुढे वाहन दुरुस्तीपर्यंत ते वाहन बंद ठेवण्यात येईल असा विश्वास दिला. याबाबत प्र.आगार व्यवस्थापक श्री कदम यांचेशी चर्चा केली असता सदरचे वाहने हे जुन्या मॉडेलचे आहे त्याच्या चार पाच काचा फुटलेल्या आहेत, त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही त्या प्रकारच्या काचांची मागणी केली आहे. अशा प्रकारची चार पाच वाहने आगारात आहेत. अचानक आलेल्या वादळ पावसाने प्रवाशी व लहान मुलांना त्रास झाला त्याबद्दल आपण दिलगीर आहोत. या सर्व वाहनांची ताबडतोड दुरुस्ती करण्यात येईल व प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येईल असेही सांगीतले.
 
Top