उस्मानाबाद :- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरळित व शांततेत पार पाडल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचारी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांचे आभार व्यक्त केले.
निवडणुकीचा अधीकृत निकाल शुक्रवार, दि. 16 मे रोजी रात्री 9-20 वाजता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी केंद्रीय निवडणूक निरीक्षक रमेशकुमार मकाडिया यांच्या उपस्थितीत जाहीर केला. शिवसेना उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड हे निवडून आल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या हस्ते प्रा. गायकवाड यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रा. गायकवाड यांना 6 लाख, 7 हजार 699 तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी डॉ. पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) यांना 3 लाख 73 हजार374 मते मिळाली.
या निवडणुकीत एकूण 27 उमेदवार रिंगणात होते. एकूण 17 लाख, 39 हजार 186 मतदारांपैकी 11 लाख 18 हजार 151 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात 934 मते अवैध ठरली.
जिल्ह्यात संपूर्ण निवडणूक काळात प्रशासकीय पातळीवर विविध यंत्रणांनी समन्वयाने काम केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, श्रीरंग तांबे, अरविंद लाटकर, सहाही विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.