पांगरी (गणेश गोडसे) -: सुरुवातीला अतिशय अटितटीचा दिसत असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रा. रविंद्र गायकवाड यांनी मताधिक्याने विजयी होऊन संसदेत प्रवेश मिळवल्यामुळे युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. पांगरी विभागासह बार्शी तालुक्यात मिळालेल्या मतांच्या ओझ्याची परतफेड नवनियुक्त खासदार कशापध्दतीने करणार याकडे आता जनतेचे डोळे लागले आहे. आपल्या मताचे चिज झाल्याचे बोलत मतदारसंघाच्या विकासाबाबत मतदार व कार्यकर्ते मोठया आशा बाळगुन आहेत.
बार्शी मतदारसंघातील बडया शहरांसह छोटया छोटया खेडयातील कार्यकर्त्यांनी मोठया मोठया अपेक्षेने रविंद्र गायकवाड यांना मताधिक्य देत इतरांना आपली मते गायकवाड यांच्या ओजळीत टाकण्यास भाग पाडले होते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सोलापुर जिल्हयातील एकमेव तालुक्याचा सहभाग असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघाने रविंद्र गायकवाड यांना मतदारसंघातुन सर्वाधिक 55 हजार मतांचे मताधिक्य देऊ केले. गत निवडणुकीत गायकवाड यांना बार्शी तालुक्यातील मतदारांमुळेच अल्पशा मतांनी हार पत्करावी लागली होती. तेव्हा त्यांच्या विरोधी उमेदवाराला 20 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य बार्शी तालुक्याने देऊ केले होते. यावेळेस गतवेळेच्या परिस्थतीत आमुलाग्र बदला झाला. यावेळी मोदी लाटेपुढे त्या वीस हजार मतांची वजाबाकी करूण 55 हजार मते आपल्याकडे खेचुन घेण्यात युतीचे उमेदवार यशस्वी झाल्याचे दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीत बहुतांश तालुक्यांत युतीच्या उमेदवारांचीच पठाराखण केली आहे.
अनेक दशकांच्या घराणेशाहीला सुरूंग लावत अखेर युतीच्या उमेदवार सरांनी दिल्ली सर केली आहे. निकाल व मताधिक्य जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. सुरूवातीला सर्वच उमेदवारांनी बार्शीला वाळीत टाकुन या मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवली नव्हती. वृत्तपत्रांमधुन तशा बातम्या प्रसिदध झाल्यानंतर अनेकांना जाग आल्यानंतर त्यांनी तालुक्यात प्रचारयंत्रणा उभारली होती. रविंद्र गायकवाड यांना प्रचंड मताधिक्य प्रदान केल्यामुळे तालुक्याच्या अपेक्षा उंचावल्या असुन त्यांच्यापुढे विकासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार वगळता सर्वच उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचवता आलेले नाही. यावरून आलेली लाट ही कशी होती याचा अंदाज येऊ शकतो.
कोणत्या पक्षाच्या नेत्याने कोणाचे व कसे काम केले याचा व खर्चाचा हिशोबाचा ताळमेळ लावण्यात आता वरिष्ठ नेतेमंडळी व कार्यकर्ते गुंतली जाणार असली तरी आता या गोष्ठींना फारसे महत्व रहाणार नाही. कोणी काम केले कोणी धोका दिला यावर चर्चासत्र आता रंगु लागली आहेत.
उस्मानाबाद मतदारसंघासह देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रणित आघाडीचे सरकार बहुमताने विराजमान होत असताना जनता मात्र या शासनाकडे मोठया आशेने पाहताना दिसत आहे. जनता व कार्यकर्त्यांनी ज्या अपेक्षेने मोदी सरकारला आपली भरभरून मते दिली आहेत त्या मतांची परतफेड सरकारकडुन तेवढयाच पध्दतीने अपेक्षित आहे. देशात तरूण-तरूणींसह अबाल वृध्दांनीही महायुतीच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेऊन एकहाती सत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेने दिलेल्या मतदान रूपी दानाची युतीशासन विकासकामात कशी परतफेड करेल हे येणारा काळच दाखवणार आहे. तळागाळातील भोळया भाबडया जनतेसह व्यापारी व उद्योगपतींनी उघडपणे भुमिका घेऊन मोदी सरकारचा नारा दिल्यामुळे देशात मोदीलाट निर्माण होऊन शासन तयार होत आहे. समाजातील प्रत्येक घटक आज वेगळया अपेक्षेने पहात असुन त्यंच्या इच्छापुर्तीची दखल घेऊन विकास साधला जाणार काघ? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.