कळंब -: उस्मानाबाद जिल्ह्यातील निवडणुक अधिकारी व कर्मचा-यांना इतर जिल्ह्याप्रमाणे नियमानुसार वाढीव भत्ता देण्यात यावा, असे आदेश उस्मानाबाद उपजिल्हानिवडणुक अधिकारी यांनी सहाय्यक निवडणुक अधिकारी व तहसिलदार यांना दिले आहे.
दि. 17 मार्च रोजी झालेल्या उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील निवडणुक अधिकारी कर्मचा-यांना इतर जिल्ह्याच्या तुलनेत खूपच कमी भत्ता दिला आहे, ही बाब महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी उस्मानाबाद जिल्हा निवडणुक अधिका-यांना निवेदन देवून निदर्शनास आणून दिली व इतर जिल्ह्याप्रमाणे भत्ता देण्याची मागणी केली होती. त्यानुसार उपजिल्हानिवडणुक अधिकारी यांनी जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर व उमरगा येथील सहाय्यक निवडणुक अधिकारी व जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना पत्र देऊन निवडणुक अधिकारी व कर्मचा-यांना इतर जिल्ह्याप्रमाणे नियानुसार अनुज्ञेय निवडणुक भत्ता देण्यात यावा, असे आदेश निर्गमित केले आहे. जिल्ह्यातील तहसिलदारांनी लेखा व मानधन कक्षास पत्र देऊन वाढीव तरतुदीची मागणी केल्याने इतर जिल्ह्याप्रमाणे निवडणुक भत्ता मिळणार असल्याने शिक्षकास समाधान व्यक्त होत आहे.
या निर्णयाचे संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, जिल्हाध्यक्ष एल.बी. पडवळ, सोमनाथ टकले, अशोक जाधव, भक्तराज दिवाणे, प्रदिप मदने, संतोष देशपांडे, मनोज चौधरी, राजेंद्र बिक्कड, नंदकुमार मोरे, राजेंद्र गव्हाणे, दत्ता पवार, हरी पवार, सुधीर वाघमारे, डी.डी. कदम, धनाजी मुळे, संतोष मोळवणे, विरभद्र कवठे, सुदर्शन जावळे, चंद्रकांत कदम आदींनी स्वागत केले आहे.