कळंब :- येथील पत्रकार तथा कळंब येथून काही काळ निघालेल्‍या साप्‍ताहिक मांजरा टाईम्‍सचे संपादक मुर्तजा शेख (वय 65 वर्षे) यांचे सोमवार रोजी कळंब येथे ह्दयविकाराच्‍या झटक्‍याने निधन झाले. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्‍हाध्‍यक्ष मिनाज शेख यांचे ते वडील होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्‍नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top