उस्मानाबाद -: तालुक्यातील शेकापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदीर येथे दि. 8 ते 14 मे या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, रामायण कथा व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे - सकाळी 4 ते 6 काकडा आरती, 9 ते 11 ज्ञानेश्वरी पारायणी, 11.30 ते 12 श्रीची आरती, दुपारी 1 ते 3 महिला भजन, 3 ते 6 रामकथा, 6 ते 7 श्रींची आरती, 7 ते 9 किर्तन होणार आहे. दि. 8 मे रोजी ह.भ.प. नवनाथ महाराज चिखलीकर, दि. 9 रोजी नितीन महाराज सुरवसे, दि. 10 रोजी मोहन अप्पा वाघुलकर, दि. 11 रोजी तानाजी महाराज भोयटे, दि. 12 रोजी महादेव महाराज तांबे, दि. 13 रोजी ज्ञानेश्वर महाराज अनसुर्डेकर यांचे कीर्तन होणार असून दि. 14 मे रोजी काल्याचे किर्तन हभप दादा महाराज सोनटक्के यांचे होणार आहे. तर शिवरत्न महिला भजनी मंडळ, श्री संत गोरोबाकाका महिला भजनी मंडळ, संतोषी माता महिला भजनी मंडळ, मुक्ताई महिला भजनी मंडळ, भक्ती महिला भजनी मंडळ यांची भजनी होणार आहे. तसेच हरिजागर पंचक्रोशीतील हरिभक्त करणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मंदीर ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.