उस्मानाबाद :- जिल्ह्यातील  माजी सैनिकांच्या पाल्यांना व युवक/युवतींना सूचित करण्यात येते की, महासैनिक ट्रेनिंग सेंटर, कसबा- बावडा कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नामांकन भारत सरकारचा सुरक्षा कोर्स नंबर 38 व 39 दिनांक 17 मे ते 9 जुन  14 व 21 जुन 14 ते 14 जुलै,2014 पर्यंत प्रशिक्षण चालणार आहे. प्रशिक्षणासाठी  प्रवेश शुल्क 4 हजार रुपये असून  यशस्वी प्रशिक्षणार्थींना जमा केलेली  रक्कम  शासनातर्फे परत मिळणार आहे. त्याशिवाय मेस्केाकडून एक हजार रुपये प्रोत्साहन रक्कम मिळेल. अधिक माहितीसाठी 0231-2663132, 9422039718/9021550363 व 8378842449 व संपर्क साधावा, इच्छुक माजी सैनिकांच्या पाल्यांनी व युवकांनी या सेक्युरीटी प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन  मेजर (नि)  सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद  यांनी केले आहे.
 
Top