उस्मानाबाद :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी एसएसबी प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सैन्य दलातील तज्ञ अधिका-यांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंठ्रीव्दारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणा-या ज्या महाराष्ट्रीय नवयुवक/ युवतींना सशस्त्र सैन्य दलाकडून एसएसबी परीक्षेची मुलाखत मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवारांसाठी एएसबी मुलाखतीचेपुर्व तयारीसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग 3 ते 12 जुन,2014 या कालावधीत घेण्यात येणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी 27 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतिसह मुलाखतीस हजर रहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0253/2451031 व 2451032 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी केले आहे.
कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व नॅशनल डिफेंन्स ॲकडेमी एक्झामिनेशन युपीसएससी पास झालेली असावी व त्यासाठी सर्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेचे असावे. एन. सी. सी. सी सर्टिफिकेट ए/बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वाट्ररने एस. एस. बीसाठी शिफारस केलेली असावी. टेन्किल ग्रॅज्युएट प्रशिक्षणसाठी एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर आलेले असावे. अथवा युनिनव्हसिटी एन्ट्री स्किमसाठी एस. एस. बी. कॉल लेटर आलेले असावे अथवा एस एस बीसाठी शिफारस केल्याच्या यादीत नाव असावे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामुल्य सोय करण्यात आली आहे. भोजनासठी प्रति दिवस रुपये 60/-प्रमाणे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.पात्र उमेदवरांनी वरील प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.