उमरगा :-
उमरगा तहसिल कार्यालयातील एम.एल कोंडेकर (अ.का.) या कर्मचा-याच्या मृत्यूप्रकरणी उस्मानाबादचे अप्पर जिल्हाधिकारी हे जबाबदार असल्याचे आरोप करुन त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी तलाठी, मंडळ अधिका-यांसह सर्व महसुल कर्मचा-यांनी दि. 13 मे पासून उमरगा येथे लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना कर्मचा-यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा तहसिल कार्यालयात दि. 6 मे रोजी अप्पर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी पूर्व सूचना न देता सर्व कार्यालयीन कर्मचा-यांची अचानक बैठक घेतली. यावेळी त्यानी सर्व लिपिकांचे दप्तर सहा बंडल पध्दतीमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यानुसार सर्व कर्मचा-यांनी दप्तराचे अद्यावतीकरण केले असल्याबाबत सांगूनही अप्पर जिल्हाधिका-यांनी सर्व कर्मचा-यांना त्यांच्याकडील विभागातील कामकाजाबाबत विचारणा केली. त्यानुसार एम.एल. कोंडेकर (अ.का.) यांनाही त्यांच्या कामकाजाबद्दल विचारणा केली. अप्पर जिल्हाधिका-यांनी त्यांच्याकडील भुकंपग्रस्त प्रमाणपत्र वाटप करण्यास सुचित केले. त्यानुसार संबंधित कर्मचा-यांने सदर प्रमाणपत्राचे काम प्रलंबित नसल्याचे सांगितले. परंतु अप्पर जिल्हाधिका-यांनी कोंडेकर यांना संगणकावर कामकाज करण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी टायपिंग करता येते. परंतु संगणकावर स्पीडमध्ये काम करता येत नाही असे सांगितले असता अप्पर जिल्हाधिका-यांनी एक महिन्याच्या आत संगणकावर चांगल्याप्रकारे काम करता आले पाहिजे असे सांगून अन्यथा तुम्हास नौकरीतून बडतर्फ करणार असल्याचे दम दिले. इतर कर्मचा-यांना पण बडतर्फीची कार्यवाही करण्यास तहसिलदारांना अहवाल सादर करण्याचे सुचित केले. तसेच यापुढे दौ-यावर येताना निलंबित, बडतर्फीची आदेश प्रत सोबत घेऊन येणार असून काम पूर्ण न झाल्यास सदर आदेश प्रतमध्ये कर्मचारी यांचे नाव नमुद करुन संबंधितावर कार्यवाही करणार असल्याचे अत्यंत असंवैधानिक पध्दतीने सांगितले. तसेच कोंडेकर यांना तुम्ही भूकंपग्रस्त प्रमाणपत्र वाटप करणेकामी दलालीचे काम करता असे म्हणून सर्व संबंधित कार्यालयीन कर्मचा-यांसमोर अत्यंत हीन पध्दतीची अपमानास्पद वागवणूक दिली. सर्व कार्यालयीन कर्मचा-यांना अत्यंत भितीजनक व दहशतीच्या शब्दामध्ये बोलून सर्व कर्मचा-यांवर दहशत निर्माण केल्याचे आरोप करण्यात आले आहे. कोंडेकर हे स्वतः उत्तर देत असताना त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्याचबरोबर इतर कर्मचा-यांचेही म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे सर्व कर्मचा-यांमध्ये व विशेषतः कोंडेकर यांच्यावर दहशतीचे सावट निर्माण झाल्याने दि. 6 मे च्या सायंकाळी त्यांचे रक्तदाब वाढले. ते औषधोपचार करुन दि. 7 मे रोजी कार्यालयात कार्यालयीन कामकाज केले. दि. 8 मे रोजी परत छातीमध्ये सौम्य प्रकारच्या वेदना होण्यास सुरुवात झाली व नंतर ते तुळजापूर येथे उपचार घेतले. त्यानंतर दि. 9 मे रोजी तहसिल कार्यालयास जिल्हाधिकारी कार्यालयातून दुरध्वनीवरुन माहिती पुरविण्यात आली की, जिल्हाधिकारी हे दि. 13 मे रोजी उमरगा-लोहारा दौ-यावर येत असून दि. 6 मे रोजीच्या बैठकीतील संबंधित कर्मचा-यांवर कार्यवाही करणार आहेत. त्यामुळे कोंडेकर हे अत्यंत भयभीत झाले व दि. 11 मे रोजी झालेल्या राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या बैठकीमध्ये कोंडेकर यांनी आपल्यावर वरिष्ठांनी अन्याय करीत असल्याची व्यथा मांडली. यानंतर रस्त्यातच त्यांना ह्दय विकाराचा झटका आला. सोलापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.
निवडणुकीचे कामकाज पूर्ण करुन कर्मचारी कार्यालयातील कामकाज करीत असून कर्मचा-यांना तालुक्यातून आलेल्या जनतेस त्यांचे प्रश्न सोडविणे, संवाद साधणे यामध्ये बराच वेळ जातो. तरीही कर्मचारी कार्यालयीन कामकाज पार पाडत आहेत. तालुक्यातील तलाठी यांनाही दम देवून रात्रीसुध्दा कामकाज करण्यास सक्ती केली. त्यामुळे तालुक्यातील सर्व कर्मचा-यांत भिती निर्माण झाल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. ‘बडतर्फ केले जाईल’ या भितीपोटी तलाठी व सर्व कर्मचा-यांचे मानसिक संतुलन वाढल्याने विपरित घटना घ्डण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याप्रकरणी आपण संबंधितांना सूचना देऊन अप्पर जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि. 13 मे पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन कर्मचा-यांनी सुरु केले आहे. निवेदनाची प्रत राज्याचे मुख्य सचिव, महसुल व वन्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव, राज्य महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष, उस्मानाबाद जिल्हा महसुल संघटनेचे अध्यक्ष, उस्मानाबाद जिल्हा तलाठी संघ, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदींना देण्यात आले आहेत. या निवेदनावर गायकवाड जे.एस., पठाण डी.जी., पाटील व्ही.टी. वैरागे आर.एस., यांच्यासह 38 कर्मचा-यांच्या स्वाक्ष-या आहेत.