उस्मानाबाद :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबादतच्यावतीने  कामगार दिनाचे औचित्य साधुन  जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय कामगार दिन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सुरेंद्र तावडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा  करण्यात आला.
       यावेळी जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. शिंदे, वकील मंडळाचे अध्यक्ष आर. एस. लोमटे , स्थानिक सर्व न्यायीक अधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. बी. मोरे यांनी विधी सेवा कामगारांचे कायदेशिर हक्क व कर्तव्य दक्षता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तर न्यायाधिश जी. बी. गुरुव आणि यु. टी. पोळ यांनी यावेळी  विविध विषयावर मार्गदर्शन केले.
        या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन न्यायाधिश आय. एम. नाईकवाडी तर आभार प्रदर्शन न्यायाधिश एस. पी. रासकर यांनी केले.  
 
Top