उस्मानाबाद : पोलिस दलात 140 पोलिस शिपाई पदे भरण्यासाठी शुक्रवार दि. 6 जून रोजी प्रत्यक्ष भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी बोलावण्यात आलेल्या 750 उमेदवारांपैकी 259 उमेदवार गैरहजर राहिले. तर चाचणीदरम्यान 165 उमेदवार अपात्र ठरले आहेत. 323 उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली.
पोलिस शिपाई पदासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी 140127000002 ते 1410127001025 अशा एकूण 750 उमेदवारांना शुक्रवारी सकाळी भरतीसाठी बोलावण्यात आले होते. पैकी 491 उमेदवार पोलिस कवायत मैदानावर उपस्थित झाले. या उमेदवारांची मूळ कागदपत्रे, छाती, उंची तपासण्यात आली. या प्रक्रियेत एकूण 165 उमेदवार अपात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या 326 उमेदवारांच्या लांबउडी, गोळाफेक, 100 मीटर धावणे आदी शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. त्यांची पाच किलोमीटर धावण्याची चाचणी शनिवारी (दि. 7) सकाळी विमानतळाजवळील रोडवर घेण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज भरलेल्या अर्जापैकी 1410127001026 ते 1410127001947 अशा एकूण 750 उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी शनिवार दि. 7 जून बोलावण्यात आले आहे. या उमेदवारांनी सकाळी 6 ते 10 या वेळेत भरतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे, त्यानंतर आलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सोबत मूळ कागदपत्र व प्रवेशपत्र आणावीत, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.