उस्मानाबाद -: लातूर विभागीय मंडळ कक्षेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च -2014 परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) कनिष्ठ महाविद्यालयांना  विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका व तपशीलवार गुण  दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप मंगळवार,दि.10 जून रोजी 3 वाजता  वाटप जिल्हा परिषद कन्या प्रशाला,उस्मानाबाद या वितरण केंद्रावर  करण्यात येणार आहे. तसेच त्याच दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात या गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय सचिवांनी कळविले आहे.
   तरी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी  संबंधित केंद्रावरुन विद्यार्थ्यांचे गुणपत्रक  व तपशीलवार गुण  दर्शविणारे शालेय अभिलेख घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
     ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी मुळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर विहित नमुन्यात शुल्कासह दि.20 जून,2014 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत मुळ गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. संबंधितांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालय व लातूर विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
ऑक्टोंबर-2014 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाची आहेत. त्यांच्या तारखाही स्वतंत्र जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार योजनेतंर्गत पुन:श्च परीक्षेस प्रविष्ठ होण्याची संधी 2008 पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार फेब्रुवारी/मार्च,2014 च्या बारावी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोंबर-2014 व फेब्रुवारी-2015 अशा दोन संधी उपलब्ध राहतील.
     परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत देण्याची व परीक्षेपासून पुनर्मुल्याकंन करण्याची सुविधा उपलब्ध आली आहे. उत्तर पत्रिकेचे पुनर्मुल्याकंन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाकिंत प्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसात पुनर्मुल्याकंनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात शुल्क भरुन लातूर विभागीय मंडळाकडे  विद्यार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक राहील.ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी विभागीय मंडळ, लातूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. 
 
Top