बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४१ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्य सेनेतर्फे सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात जवाहर हॉस्पिटल परिसरातील अर्धपुतळ्यास दुग्धाभिषेक केला. यावेळी सर्व समाजबांधवांना बरोबर घेऊन घोषणा देत शिवतीर्थाचे व मिठाईचे वाटप करण्यात आले.
    याप्रसंगी जिजाऊ, शिवराय, संभाजी महाराज यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, रमेश घोलप, अमित रसाळ, शैलेश वखारिया, ऍड्. मकेश जगताप, किशोर मांजरे, ऍड्.अविनाश गायकवाड, ऍड्. असिफ तांबोळी, एल.बी.शेख, वाहिद शेख, प्रशांत कथले, दिपक राऊत, काका फुरडे, ऍड्.राजश्री डमरे, ऍड्.प्रशांत शेटे, शिरीष जाधव, निलेश पवार, टिंकू पाटील, शंकर वाघमारे, विवेक गजशिव, नागजी नान्नजकर, इलियास शेख यासह विविध समाजातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रितम मोरे, युवराज ढगे, श्रेयस परदेशी, अजिम तांबोळी, बापू कुलकर्णी, धनराज गोटे, मयुर गोफणे, नितीन माने, रत्नदिप गवळी, नाना कापसे, धनराज सुतार, पंत, बारंगुळे, सचिन मुकटे, विनोद बुरांडे, रविराज पाटील, बालाजी ढगे यासह शिवराज्य सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
 
Top