उस्मानाबाद -: उस्मानाबाद येथील बार्शी नाका परीसर आणि यशवंत नगर भागात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तर वीज मंडळाचे अधिकारी या बाबत उदासिन असल्यामुळे नागरीकातून संताप व्यक्त होत आहें .
    याबाबत अधिक माहिती अशी की, या परिसरात मागील तीन महिन्यापासुन वीजपुरवठा खंडीत होत आहे. हिला थोडाही वारा सोसेनासा झाला असून वर वीज चमकली, जरा जोरात वारा आला, पावसाचे चार थेंब पडले की लगेच वीज गुल, असे म्हणण्‍याची वेळ नागरिकावर आली आहे.
    पावसाला सुरुवात होण्याअगोदर प्री मान्सून मेटेन्स वीज मंडळ दरवर्षी करत असते. तरीही सतत घोटाळा होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. या आठ दिवसात तर या भागात वीज पुरवठा खंडीत होण्याचा कहर झाला असून कधी ही येते कधी ही जाते तिचे नाव लाईट असे लोक विनोदाने म्हणत आहेत.
    लाईट बील न भरल्यास वीज पुरवठा खंडीत केला जाईल, असा वीज बिलावर मोठा शिक्का मारलेला असतो. शिक्का मारण्याची गरज नाही वीजपुरवठा सुरळीत करा, अशी मागणी जोर धरत आहे. या भागात लाईट गेली आहे म्हणून सांगण्‍यासाठी  फोन केला आसता फोन उचलण्याची तसदी सुद्धा हे कर्मचारी घेत नाहीत हे विशेष.
 
Top