पांगरी (गणेश गोडसे) : बार्शी तालुक्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटात मान्सुनपुर्व पाऊस पडुन तालुक्यात ठिकठिकाणी चक्री वादळामुळे घरावरील पत्रे उडुन जाऊन झाडे उन्मळुन पडुन लाखो रूपयांचे नुकसान झाले असुन सुदैवाने जिवितहाणी टळली आहे. चारे येथील बँक ऑफ इंडीयाच्या शाखेच्या छतावरील ऑनलाईन यंत्रणा विजपुरवठयाची सोलर यंत्रणा पुर्णपणे उखडुन पडुन पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळास जिल्हा परिषद विरोधी पक्षनेत्यांनी पथकांसह भेट देऊन पाहणी करून नुकसानग्रस्तांना आधार दिला.
अलीकडील दोन-तीन दिवसात बार्शी तालुक्याच्या पुर्वभागासह डोंगरी भागात मान्सुनपुर्व पावसाने थोडीशी हजेरी लावण्यास सुरूवात केली असुन पावसापेक्षा अगोदर गावावार व सगळीकडे घोंगावणारे वादळच लक्षवेधी व भितीदायक असेच ठरू लागले आहे. तालुक्यात बार्शी-पांगरी, बार्शी-चारे बार्शी-येरमाळा आदी मार्गावर झाडे पडल्यामुळे वाहतुकही खोळंबली होती. बार्शी तालुक्यात शिराळे, चारे, पांगरी आदी भागात विज वितरण केंद्राचे विजवाहक पोल कोसळल्यामुळे अनेक गावचा विजपुरवठा खंडीत झालेला आहे. जनावरांसह माणसांच्या निवास्थानावरील पत्रे उडुन गेले आहेत. चारे या एकटया गावात तर चक्री वादळाने 190 घरावरील पत्रे ऊडुन गेले असुन शेकडोजण उघडयावर आले आहेत. चारे येथील पांडुरंग वैजिनाथ जगदाळे यांच्या घरावर जुने मोठे झाड पडल्यामुळे नुकसान झाले असुन बाबुशा सोनार अब्दुल गणी, एकनाथ जगदाळे, अजिनाथ झालटे आदींच्या घरावरील व जनावरांच्या गोठयावरील पत्रे उडाले आहेत. तसेच चारे येथीलच जय भवानी सार्वजनिक वाचनलयावरील पत्रे उडुन गेले आहेत.
घटनेनंतर सोलापुर जि.प.चे विरोधी पक्षनेते संजय पाटील यांनी बार्शी मंडळाचे महसुल अधिकारी सुपेकर, चारेचे गांव कामगार तलाठी मुंढे, ग्रामसेवक खळदकर, कृषी विभागाचे कोलगे या पथकासह नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी केली. ग्रामस्थांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.