उस्मानाबाद :- जिल्हा पोलीस भरती येथील पोलीस मुख्यालय, उस्मानाबाद या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस मुख्यालय, उस्मानाबाद लगतच्या 100 मीटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 कलम अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात घोषणा देता येणार नाहीत, परिसरात उमेदवार अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही, परिसरात उमेदवारांना मोबाईल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स,ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल, कोणत्याही उमेदवाराकडून भरती प्रक्रिया सुरळीपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही.
पोलीस भरतीसाठीचे उमेदवारशिवाय इतर व्यक्तींना पोलीस कवायत मैदान, उस्मानाबाद येथे प्रवेश नसेल. केवळ पोलीस भरतीसाठी नेमणुक केलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस बंदोबस्ताचे अधिकारी/कर्मचारी यांनाच या परिसरात प्रवेश राहील. इतरांना (उमेदवारांच्या नातेवाईकासह) प्रवेश असणार नाही. या 100 मीटर आवारात उमेदवार वगळून इतर 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.
हे आदेश पोलीस भरती प्रक्रियेत काम करणारे अधिकारी, कर्मचारी, उमेदवार यांचेबाबत त्यांचे कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही. हे आदेश 6 जूनच्या सायंकाळी 6 वाजल्यापासून दि.15 जूनच्या मध्यरात्रीपर्यत लागू राहतील.