उस्मानाबाद -: जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी रविवार, दि. 8 जून रोजी सकाळी 11 ते 1 या कालावधीत लिपीक-टंकलेखक परीक्षा-2014 सात परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात अपर जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 कलम अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
यानुसार श्रीपतराव भोसले हायस्कुल जुनी इमारत, श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तिसरा मजला (नवीन इमारत), दुसरा मजला (नवीन इमारत), पहिला मजला (नवीन इमारत), रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,पार्ट ए आणि बी उस्मानाबाद आणि जि.प.माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा, उस्मानाबाद या केंद्रावर ही लेखी परीक्षा होईल.
या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात घोषणा देता येणार नाही. शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही, केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानपटटी, टायपींग सेंटर, एसटीडी बुध, ध्वनीक्षेपक, कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे आदि माध्यमे बंद राहतील. मोबाईल, फोन सेल्युलर फोन, ईमेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्रावर वाहन प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रावर नेमणुक केलेले अधिकारी, कर्मचारी, शासकीय कामावरील अधिकारी व कर्मचारी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि उमेदवार यांनाच केंद्रात प्रवेश राहील. इतराना प्रवेश राहणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि परीक्षार्थी,परीक्षा केंद्रावर नेमणूक केलेले अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांचे परीक्षासंबधी कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही. हे आदेश 8 जूनच्या सर्व परीक्षा केंद्राचे परिसरात सकाळी 8 सायंकाळी 4 वाजेपर्यत लागू राहतील.