उस्मानाबाद -: जिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणी  जिल्हास्तरीय समितीने निकषानुसार पात्र ठरविलेल्या मयताचे वारसांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत देण्यात येते. त्यानुसार गणेश केरबा कानडे, मृत्यू दि.18 एप्रिल,2014 (वय 30, रा.हसेगाव (शि),ता.कळंब जि.उस्मानबाद), प्रविण सुरेश खराडे,  मृत्यू दि.21 एप्रिल,2014 (वय 18,रा.पाडोळी, ता.उस्मानाबाद) आणि  रावसाहेब बाबु शिंदे, मृत्यू दि.23 एप्रिल,2014 (वय 65, रा.बुरुडवाडी ता.भूम) या तीन आत्महत्याग्रस्त  शेतकऱ्यांच्या वारसांना शासनामार्फत प्रत्येकी 1 लाख रुपये मदत देण्यात येणार आहे.
 
Top