उस्मानाबाद -: स्थानिक क्षेत्र हे ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित करण्यासाठी लोहारा नगरपंचायत गठीत करण्याच्या दृष्टीने 1 मार्च,2014 रोजी समक्रमांची उदघोषणा निर्गमित करण्यात आली होती. या उदघोषणेवर आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्याचे आक्षेप जिल्हाधिकारी यांचेकडे  नोंदविण्यासाठी 30 दिवसाची संधी वाढवून देण्यात येत आहे. यासाठी अनुसूची अ व ब  संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र लोहारा (बु) ग्रामपंचायतीत असलेले संपूर्ण क्षेत्र गावठाण व सर्वे नंबर 1 ते 218 स्थानिक हद्दीचा तपशील व चतु:सिमा निर्धारित केल्या आहेत.
       लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 मधील भारत निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितामुळे उदघोषणा शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून तीस दिवसांच्या आत तशी अधिसूचना निर्गमित करण्याकरीता आक्षेप मागविण्याच्या द्ष्टीने व्यापक प्रसिध्दी देता येणे शक्य झाले नाही.त्यामुळे आक्षेप नोंदविण्यासाठी ही मुदत वाढवून देण्यात आल्याचे तहसीलदार, लोहारा यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
    प्रस्तावित नगरपंचायतीचे क्षेत्र दर्शविणारा आराखडा निरीक्षणासाठी जिल्हाधिकारी, उस्मानाबाद, तहसीलदार, लोहारा आणि लोहारा ग्रामपंचायत यांच्या कार्यालयात कामकाजाच्या वेळेत उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही कळविण्यात आले आहे.
 
Top