उस्मानाबाद :- अपर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय,अमरावती या कार्यालयातर्गत वर्ग 3 संवर्गातील प्राथमिक शिक्षण सेवक मराठी/इंग्रजी, माध्यमिक शिक्षण सेवक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सेवक, अधिक्षक (पुरुष),अधिक्षिका (स्त्री), गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री),उपलेखापाल, वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक, आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, लघुटंकलेखक, लिपिक-टंकलेखक आदि पद भरतीबाबत जाहीरात फेब्रुवारी 2014 मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार  पात्र उमेदवारांकडून  अर्जही मागविण्यात आले होते. वरील पदासाठीची लेखी परीक्षा 29 जुन रोजी घेण्यात येणार आहे.
    परिक्षेबाबत सूचना, अटी, शर्ती, व अधिक माहितीसाठी पात्र उमेदवारांनी www.mahatribal.gov.in  या संकेतस्थळावर पहावी, असे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती यांनी आहे.  
 
Top