उस्मानाबाद :- जिल्ह्यातील अनुसूचित जमाती (पारधी आदिवासीना) जातीचे प्रमाणपत्र निर्गमीत करण्यासाठी उस्मानाबाद व तुळजापूर येथे विशेष कॅम्पचे आयोजन  करण्यात आल्याची माहिती उस्मानाबादच्या उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शोभा राऊत यांनी दिली आहे.
      यानुसार उस्मानाबाद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात दि. 24 जुन रोजी, तहसील कार्यालय तुळजापूर येथे दि. 25 जुन रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र पारधी आदिवासी नागरीकांनी आपले प्रस्ताव  सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर करावेत. प्रस्तावात काही अडचणी/ त्रुटी असल्यास विशेष मार्गदर्शन करुन त्रुटीचे निराकरण करुन जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील.
    इच्छुक उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीच्या आदिवासींनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे. या कामात गतीमानता येण्यासाठी संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, महा-ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्राना आवश्यक त्या सूचना दिल्या असून  पात्र नागरीकांनी या विशेष कॅम्प मोहिमेचा लाभ घ्यावा,असे श्रीमती राऊत यांनी केले आहे.                                
 
Top