नळदुर्ग :- दृष्‍टी उद्योग समूहाचे अध्‍यक्ष अशोक (भाऊ) जगदाळे यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त दि. 23 ते 26 जून या कालावधीत विविध भरगच्‍च कार्यक्रमाचे आयोजन कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्‍ठान नळदुर्ग यांच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
   जगदाळे यांच्‍या वाढदिवसाचे औचित्‍य साधून सोमवार दि. 23 जून रोजी काटगाव (ता. तुळजापूर) येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात मोफत स्‍त्री रोग व ह्दयरोग चिकित्‍सा निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे. तसेच ह.भ.प. निवृत्‍ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्‍या किर्तनाचा कार्यक्रम मंगळवार दि. 24 जून रोजी सायंकाळी सहा वाजता नळदुर्ग येथील जिल्‍हा परिषद (मुलांची) प्रशालेच्‍या मैदानावर आयोजित करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमास माजी आमदार सिद्रामप्‍पा आलुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी वाढदिवसानिमित्‍त अशोक (भाऊ) जगदाळे यांचा सत्‍कार करण्‍यात येणार आहे.
       गुरुवार दि. 26 जून रोजी जळकोट (ता. तुळजापूर) येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मोफत स्‍त्री रोग व ह्दयरोग चिकित्‍सा निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. या शिबीरासाठी सोलापूरच्‍या अश्विनी रुग्‍णालयातील ह्दयरोग तज्ञ व स्‍त्रीरोग तज्ञ डॉक्‍टर उपस्थित राहून रुग्‍णांची तपासणी करुन निदान व उपचार करणार आहेत. त्‍याचबरोबर मोफत रक्‍त तपासणी, ई.सी.जी. व इतर तपासण्‍या करण्‍यात येणार आहेत. रुग्‍णांना येण्‍या-जाण्‍यासाठी मोफत वाहनांची सोय करण्‍यात आली आहे. मार्गदर्शक डॉ. सिद्रामप्‍पा खजुरे हे आहेत.
    तरी परिसरातील नागरिकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्‍याचे आवाहन जगदाळे मित्र मंडळ, धर्मवीर संभाजी तरुण मंडळ, एस.बी.आर. ग्रुप, जय हिंद प्रतिष्‍ठान, शिवशाही तरुण मंडळ, भोईराज तरुण मंडळ, न्‍यू चैतन्‍य तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ भवानी चौक, नव चैतन्‍य तरुण मंडळ, मोलाना आझाद क्‍लब, जय हनुमान तरुण मंडळ, माऊली तरुण मंडळ, भवानी नगर तरुण मंडळ, जयहिंद तरुण मंडळ व्‍यासनगर, शिवनेरी तरुण मंडळ, व्‍यंकटेश नगर तरुण मंडळ, इंदिरा नगर तरुण मंडळ, वसंतराव नाईक युवा मंडळ, सेवालाल तरुण मंडळ, दुर्गा माता तरुण मंडळ, अण्‍णा भाऊ साठे नगर तरुण मंडळ, जवाहर तरुण मंडळ, महाराणा प्रताप तरुण मंडळ, भवानसिंग महाराज तरुण मंडळ, वागदरी सम्राट ग्रुप तरुण मंडळ, कै. जनार्दन रणे प्रतिष्‍ठान आदी मंडळाच्‍या कार्यकर्त्‍यांनी केले आहे.
 
Top