कळंब -: येथे झालेल्या राज्यस्तरीय आट्यापाट्या ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामन्यात मुलींच्या गटात उस्मानाबादच्या संघाने भंडार्‍याच्या संघाला धूळ चारत तर मुलांच्या गटात रायगडला हरवून वाशिम संघाने अजिंक्यपद पटकाविले. यशस्वी संघांचा पुणे येथील क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे व रोटरीचे प्रांतपाल डॉ. व्यंकटेश मेतन यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरव करण्यात आला.
       शहर रोटरी क्लब व कै.महादेव गव्हार क्रीडा मंडळ (येडशी) यांच्या संयुक्त विद्यमाने येथे या दोन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.याचे शुक्रवारी प्राचार्यडॉ.अशोक मोहेकर यांच्या हस्ते उद््घाटन झाले.यावेळी नगराध्यक्षशिवाजी कापसे, रोटरीचे डॉ.दीपक पोफळे, पालिकेतील गटनेते प्रा.श्रीधर भवर, शहर रोटरीचे अध्यक्षदत्ता पवार, प्रकल्प अध्यक्षप्रा.संजय घुले आदी उपस्थित होते.
      या स्पर्धेत स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गंगाधर शिंदे यांची निवड झाली.पारितोषिक वितरण कार्यक्रमास रोटरीचे डॉ.मेतन, विद्याभवन शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एस.पवार, डॉ.दीपक कविश्‍वर, प्राचार्यामनोरमा भवर, उपनगराध्यक्षपांडुरंग कुंभार, बाजार समितीचे संचालक प्रा.बाळकृष्ण भवर, शशिकांत फाटक, प्रताप मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
      या स्पर्धेत तीस संघांनी सहभाग नोंदविला.स्पर्धेमुळे शहरात क्रीडामय वातावरण तयार झाले होते.स्पर्धेसाठी अँड.दत्ता पवार, धर्मेंद्र शहा, सुशील तीर्थकर, संजय देवडा, शरद गव्हाण, क्रीडा प्रशिक्षक लक्ष्मण मोहिते, अनिल शिंदे, राजाभाऊशिंदे, सुनील बोरकर आदंनी परिश्रम घेतले. आभार प्रा.घुले यांनी मानले.
 
Top