बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील तेलगिरणी चौक परिसरात असलेल्या रेडलाईट एरियातील विद्यार्थ्यांना लोकप्रतिष्ठा विचार मंचच्या वतीने ४०० शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. गुरुवारी दि.१९ रोजी संस्थेचे अध्यक्ष राहुल भड यांच्या उपस्थितीत वही वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला.
    बायडाबाई देशमुख, लक्ष्मीबाई जाधव, पूजा चव्हाण यांच्यासह संस्थेचे नागनाथ काजळे, सुनिल पाटील, विनोद सोनवणे, विनोद काजळे, सुरेश आरगडे, पवन लाटे आदी उपस्थित होते.
    याप्रसंगी दुर्लक्षीत तसेच वंचित मुला-मुलींमध्ये शैक्षणिक जागृती, मदत, आत्मसन्मान व चांगल्या संस्काराबरोबरच शैक्षणिक प्रवाहात येण्यासाठी मदत देण्यासाठी संस्थेने हा उपक्रम केल्याचे राहुल भड यांनी सांगीतले. महिलांच्या जीवनातील परिस्थितीचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये, मानवतावादी दृष्टीकोनातून सामाजिक बांधीलकी जपावी हा उद्देश संस्थेने समोर ठेवला आहे. यासरखे अनेक चांगले उपक्रम यापुढेही राबविण्यात येणार असल्याचे भड यांनी सांगीतले.
 
Top