बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील सुभाषनगर परिसरातील संतोषीमाता चौक येथे सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत मृताची आई सुमन खंडू कांबळे रा.सांजा जि.धाराशिव (उस्मानाबाद) यांनी बार्शी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू, सासरा, दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शामल नागनाथ अवघडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. गुरुवारी दि.१९ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास स्वत:ला कोंडून अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतल्याने विवाहितेचा राहत्या घरात मृत्यू झाला आहे. उसने घेतलेल्या पैशावरुन दीर लखन हा नेहमी त्रास देत होता, चारित्र्याच्या संशयावरुन तसेच माहेरुन पैसे घेऊन येण्यासाठी सासू, सासरे, पती व दीर हे त्रास देत होते. एक वर्षापूर्वी अशा प्रकारच्या त्रासाला कंटाळून शामल हिने विषारी औषध प्राषण केले होते त्यावेळी सासरच्या लोकांनी दिलेल्या धमकीमुळे पोलिसांना तक्रार दिली नसल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
घटना घडलेल्या दिवशी मुलीचे आई-वडिल हे मुलीने फोन करुन बोलाविल्याने गावाकडून आले होते, यावेळी मुलीने त्रास होत असल्याचे रडून सांगीतले होते. यावेळी दीर लखन याने उसने पाच हजार आत्ताच्या आत्ता दिले नाही तर तुझ्या आई वडिलांना घराबाहेर जाऊ देणार नाही असे म्हणत मुलीस लाथ मारली यावेळी सासू सासरे यांनीही मारहाण केली यावेळी मयत शामल हिने रडत म्हणाली तुम्ही सर्वजण मला नेहमीच त्रास देता व मारहाण करता, मी तुमच्या त्रासाला वैतागले आहे असे म्हणून घराचा शटरचा दरवाजा लावत स्वत:ला केांडून अंगावर रॉकेल ओतून घेतले व पेटवून घेऊन आत्महत्या केली. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तिला उपचारासाठी शासकिय रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. घटनेचा पुढील तपास पो.कॉं. सुनिल बनसोडे हे करीत आहेत.