उस्मानाबाद -: 05 –औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात निवडणूक-2014 चे मतदान दि.20 जून रोजी घेण्यात आले. यामध्‍ये उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात सरासरी 40 टक्‍के मतदान झाले.
    यामध्ये  उस्मानाबाद तालुक्यात-27.78 टक्के, तुळजापूर-46.66, उमरगा-47.29, कळंब-40.93, वाशी-45.87, भूम-45.76, परंडा -43.32, लोहारा-59.50 असे एकूण 40 टक्के मतदान झाले असल्याचे  जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महसूल भवन, उस्मानाबाद येथे आपल्या मतदानाचा हक्क् बजावला. 
 
Top