परंडा -: भैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. तानाजी सावंत व उपाध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवार रोजी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे मातोश्री निवासस्थानावर हा प्रवेश सोहळा पार पडला.
याप्रसंगी संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, राजेंद्र राऊत, अनिल खोचरे, धनंजय सावंत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील सावंत बंधुंनी पुणे येथे शैक्षणिक संकुलाची उभारणी केली. त्यानंतर साखर कारखाना उभारून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील सोनारी येथेही साखर कारखान्याचे युनिट सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुकांमध्ये प्रा. तानाजी सावंत यांचा समावेश होता. मात्र, सेनेतील निष्ठावंत पदाधिकार्यांनी त्यांना विरोध केला होता. त्यामुळे नाराज झालेल्या सावंत यांनी कारखानास्थळावर विचारमंथन मेळावा घेऊन शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.