बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: नागेश गाढवे या युवकाच्या खूनाच्या आरोपातील आणखी चार आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली असून दि.२४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश बार्शी न्यायालयाने दिले आहेत.
आझाद चौक येथील नागेश गाढवे (वय २३) या युवकाचा शनिवारी दि.३१ मे रोजी गावाबाहेर बोलावून धारधार शस्त्रांनी निर्घून खून करण्यात आला होता. पोलिस तपासांत अमोल संजय मोहिते (वय २४), प्रशांत उर्फ प्रविण नवनाथ रिकीबे (वय २४,रा. राऊत चाळ), नितीन पंडित माने (वय २७, रा.सुभाष नगर), दिनेश निलप्पा कोरे (वय २३, रा.ममता बालक मंदिर जवळ, सुभाष नगर) या चार जणांना अटक करुन देण्यात आलेल्या पोलिस कोठडीनंतर मृताच्या नातेवाईकांनी खूनातील मुख्य सुत्रधाराचा शोध घेऊन योग्य न्याय मिळावा यासाठी पोलिस अधिकारी कार्यालयासमोर मोर्चा व निदर्शने केली. बार्शी शहरातील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चर्चेत आरोपींची नावे खुलेआम बोलण्यात येत होती परंतु पोलिसांकडून मुख्य सुत्रधार अथवा आरोपींना अटक करण्यासाठी ठोस कारवाई होत नव्हती. नागरिकांच्या रेट्यामुळे पोलिसांना आणखी आरोपी अटक करणे भाग पडले यावेळी तपासात समोर आलेल्या गणेश सोमनाथ पिसे, उमेश उर्फ बबल्या जयराम शेट्टी, विक्रम उर्फ पांडू अविनाश उर्फ अरविंद पवार, दत्तात्रय उर्फ दत्त्या दशरथ तौर या आणखी चार आरोपींना पांगरी पोलिसांनी अटक करुन दि.१४ रोजी न्यायालयासमोर अटक केल्यानंतर २० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश बार्शी न्यायालयाने दिले होते. शुक्रवारी दि.२० रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केल्यानंतर खूनातील आणखी तपासासाठी दि.२४ पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.