सिफा पटेल
पांगरी (गणेश गोडसे) -: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व शिक्षण मंडळातर्फे मार्च 2014 मध्ये घेन्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सुलाखे हायस्कुल बार्शीची विदयार्थींनी कु.सिफा शफिल पटेल ही सेमी ईंग्रजी विभागात 93.40 टक्के गुण मिळवुन जिल्हयाच्या गुणवत्ता यादीत आली आहे.
    कु.सिफा पटेल हिने मिळवलेल्या घवघवित यशामुळे तिचे सर्वस्थरांमधुन अभिनंदन होत आहे. जिल्हयाच्या गुणवत्ता यादीत यश मिळवुन नाव उज्जवल केल्याबदल बार्शी तालुका होमिओपॅथिक संघटने तालुकाअध्यक्ष डॉ.अरीफ शेख, डॉ.इफ्रा अरीफ शेख, अकबर शेख, शफिल पटेल, वर्गशिक्षक तोडकरी आदींनी अभिनंदन केले आहे.
 
Top