उस्मानाबाद -: भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून त्या अनुषंगाने  औरंगाबाद पदवीधर मतदार संघात  मतदान 20 जुन रोजी 58  मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार आहे.  जिल्ह्यातील 58 मतदान केंद्र क्रमांक 319 ते 376 केंद्राच्या 200 मीटर परिसरात सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी जारी केले  आहेत.
       मतदान केंद्र 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाही, मतदान केंद्र व परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ईमेल  व इतर प्रसार माध्यमे घेवून जाता येणार नाही, कोणत्याही व्यक्तीकडून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही, मतदान केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस/ वाहनास प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
          हे आदेश मतदान केंद्रावर काम करणारे अधिकारी / कर्मचारी,  मतदान केंद्रावर  निगराणी करणारे  पोलीस अधिकारी / कर्मचारी यांचेबाबत त्यांचे  निवडणूक विषयक कर्तव्य पार पाडण्याचे अनुषंगाने हे आदेश लागू राहणार नाही.
 
Top