उस्मानाबाद -: जिल्हा आहार समिती, उस्मानाबाद अंतर्गत अंगणवाडीतील बालकांना नियमित आहारपुरवठा करण्यासाठी स्थानिक पातळीवरील सक्षम व पात्र महिला बचतगट ,नोंदणीकृत महिला मंडळ, संस्थेंची निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांनी विहीत नमुन्यात आपले प्रस्ताव 5 जुलै 2014 पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना तालुकास्तरवर प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत व मुदतीत सादर करावे, असे आवाहन अध्यक्ष, जिल्हास्तरीय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उस्मानबाद यांनी केले आहे.
अर्जाचा विहीत नमुना व शर्ती व अटी याचा तपशिल संबधित तालुक्याच्या बाल विकास प्रकल अधिकारी यांच्या कार्यालयात 21 जुन ते 30 जुन या कालावधीत कार्यालयीन वेळेत कामाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यत उपलब्ध होतील़.
विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 1 ते 5 जुलै या कालावधीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना तालुकास्तरावर प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत. प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र इच्छुकांची यादी एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय संबधित तालुका सूचना फलकावर 10 जुलैपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.
यादी प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून 5 दिवसापर्यंत इच्छुकांच्या पात्र व अपात्रतेसंबंधी हरकती मागविण्यात येतील. संबंधितानी आपल्या हरकती लेखी स्वरुपात 15 जुलैपर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात संबधित तालुका येथे सादर कराव्यात. हरकती विचारात घेवनू 16 जुलै रोजी इच्छुकांची अंतीम यादी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात संबंधित तालुका नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येईल.
इच्छुकांना आहार पुरवठा करण्याचे आदेश विहीत शासन अटी व शर्तीच्या आधीन राहून निर्गमित करण्यात येतील तसेच वेळोवेळी बदलण्यात आलेले शासन निर्णय बंधनकारक राहतील. असे सदस्य सचिव, जिल्हास्तरीय समिती तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.