उस्मानाबाद :- प्रेरणा ट्रस्ट औरंगाबाद, संचलित निवासी अपंग प्रशिक्षण केंद्र कार्यशाळा, औरंगाबाद  येथे 16 वर्षावरील 40 टक्केपेक्षा जास्त अंपगत्व असलेल्या अपंगाना व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार देणारी शासन मान्य संस्था असून यात अस्थिव्यंग अपंग विद्यार्थ्यांना 10 वी / 12 वी उत्तीर्ण  सी टी सी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण, 7 वी पाससाठी टेलरींग अॅन्ड कटींगचे, 8 वी पाससाठी इलेक्ट्रानिक वायरमन आणि 10 वी प्रवेशितासाठी इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
        या कालावधीत अपंगाना स्वखर्चासाठी कमवा शिका, योजनेतून विविध उपक्रम राबवून विदयावेतन दिले जाते. खेळासाठी क्रींडांगण, मनोरंजासाठी रंगीत दुरदर्शन संच, सुसज्य ग्रंथालयाची सोय आहे. वसतीगृहात मोफत जेवण, नाष्टा, निवासाची व वैदयकिय उपचाराची सोय आहे.  ग्रामीण भागातील अस्थिव्यंग अपंगानी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रेरणा स्ट्रटच्या अध्यक्षा सिध्दी संजीव जैयस्वाल यांनी केले आहे.
        प्रवेशासाठी इच्छुकांनी अधिक माहिती व रंगीन दरवाजा जवळ, सुभेदारी गेस्ट हाउससमोर,औरंगाबादशी सपर्क साधावा. संपर्कासाठी  त्यांचा दुरध्वनी क्रमांक 0240- 2353311 पीन कोड क्रमांक  431001 असा आहे.
 
Top