उस्मानाबाद :- अपंग कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण  संस्था मिरज ता. मिरज, जि.सांगली  येथे  प्रौढ अपंगासाठी मोफत् प्रशिक्षण देण्यात येणार असून  या संस्थेत  सन 2014-15 या चालू शैक्षणिक वर्षापासून 16 ते 40 वर्ष या वयोगटातील  अपंगाना  विविध व्यवसायाचे  प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.
      या संस्थेत किमान इ . 8 वी पासच्या अपंगासाठी सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन व एम एस ऑफीस, संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. किमान इ. 10 वी पासच्या अपंग मुलांना एम. के. सी. एल. क्लिक डिप्पोला ग्राफीक डिझायनर, फोटो एडीटर, डीटीपी ऑपरेटर  वेब डिझायनर, स्टेशनरी डिझायनरचे प्रशिक्षण  तसेच इ. किमान 9 वी पासच्या मुलांना  सबमर्सिबल सिंगल फेज, थ्री फेज, मोटार अॅन्ड ऑर्मीचर रिवांयडींग आणि एम एस सी आय टी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे.
       पात्र अपंग मुलांना प्रशिक्षण कालावधीत राहण्याची जेवणाची मोफत्  सोय असून अदयावत व परीपुर्ण संगणक, कार्यशाळेत भरपूर प्रॅक्टीस व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण नेटवर्कींग व इंटरनेट अनुभवी व तज्ञ निदेशकाव्दारे प्रशिक्षण दिले जाणापर असून समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
         प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतीगृह, टाकळीरोड,म्हेत्रे मळा, गोदड मळयाजवळ, मिरज ता, मिरज जि. सांगली  पीनकोड क्रमांक- 416410 दुरध्वनी क्रमांक 0233-2222908 मोबाईल क्रं.  9422496515/ 9881609940/ 9922577561 या पत्यावर पोस्टाव्दारे  किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी  कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
         प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला,अपंगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र व उत्पन्नाच्या दाखल्याची  झेरॉक्स प्रती जोडुन प्रवेश अर्ज  31 जुलै पुर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावीत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर समितीव्दारे मुलाखती घेवून प्रवेश देण्यात येतील. प्रशिक्षणासाठी अपंगानी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व  वसतीगृह मिरज ता, मिरज, जिल्हा सांगली यांनी केले आहे.
 
Top