कळंब -: कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथील पद्मश्री शंकरबापू माध्यमिक विद्यालयाचा निकाल 87 टक्के लागला आहे. कूु. अश्विनी आण्णासाहेब सुकाळे ही 79 टक्के घेऊन प्रथम आली आहे. तर चवरे राजश्री रामराजे ही द्वितीय तर लोडकर भाग्यश्री ही तृतीय आली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विश्वंभर पाटील, विलास पाटील, मुख्याध्यापक मधुकर राऊत, परमेश्वर पालकर, दत्ता कोल्हे, कोरे संतोष यांनी अभिनंदन केले आहे.