कु. आरती कणसे
कळंब -: ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित विद्याभवन हायस्‍कूल कळंब येथील विद्यार्थ्‍यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्‍ता दहावी परीक्षेच्‍या निकालाची उज्‍वल परंपरा कायम राखत  तालुक्‍यात व जिल्‍ह्यात यशाचा दबदबा कायम राखला.
     प्रशालेतील कुू. आरती मधुकर कणसे या विद्यार्थिनीने 500 पैकी 490 गुण घेऊन 98 टक्‍के मिळवून कळंब तालुक्‍यातून सर्वप्रथम येण्‍याचा मान मिळविला. आरती कणसे हिने संस्‍कृत, गणित व इ.भू.ना.  या विषयात शंभर पैकी शंभर गुण घेऊन सर्वप्रथम येण्‍याचा मान मिळविला. 
प्रशालेचा एकूण निकाल 79.90 टक्‍के लागला. यापैकी 90 टक्‍केपेक्षा जास्‍त 12 विद्यार्थी तर 80 टक्‍के पेक्षा जास्‍त 15 विद्यार्थी, तसेच 75 टक्‍के पेक्षा जास्‍त 13 विद्यार्थी व 58 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्‍तीर्ण झाले. यामध्‍ये 90 टक्‍केपेक्षा जास्‍त गुण मिळवणारे विद्यार्थी - धुत ऐश्‍वर्या सुरेश (95%), गायकवाड अपूर्वा मुकुंद (94.80%), माने प्रांजली विनायक (93%), अभंग विशाल दत्‍तात्रय (93%), तांबडे पुजा मुरलीधर (92.40%), तिवारी रिया हेमंतकुमार (91%), पंडीत उमेश सुशांत (90.60%), लांब योगेश मोहन (90.40%), चोपडे राहुल अनुरुद्र (90.20%), पवार धनश्री (89.80%), कावळे प्रतिक्षा (88.60%), टेकाळे सौरभ (88.60%), आगलावे प्रशांत (88.60%), मुंडे अमित (87.20%), चटलेवाड सचिन (86.60%), वळेकर अमरजा (85.80%), देशपांडे श्रुती (85.20%), साेने ऋतुजा (84.80%), जाधव रोहन (84%), पाटील उमेश (83%), पालकर ऋषीकेश (83%), बन गणेश (82.60%), गायकवाड अमर (81%), राख लक्ष्‍मण (80.60%) गुणांनी उत्‍तीर्ण झाले.
           यशस्‍वी उत्‍तीर्ण विद्यार्थ्‍यांचे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर, अध्‍यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल, कोषाध्‍यक्ष भागवतराव गव्‍हाण, प्रशालेचे मुख्‍याध्‍यापक पवार व्‍ही.एस. उपमुख्‍याध्‍यापक मधुकर सावंत, पर्यवेक्षिका  शिंदे एस.बी., शरद खंदारे आदींसह शिक्षक, शिक्षकेत्‍तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
 
Top