पांगरी (गणेश गोडसे) :- सोलापर ग्रामीण पोलिस दलातील प्रशासकीय बदली झालेल्या 474 पोलिस कर्मचा-यांना अद्यापही बदली झालेल्या ठिकाणाहुन कार्यमुक्त करण्यात न आल्यामुळे बदली झालेल्या पोलिस कर्मचा-यांसमोर अनेक प्रश्न उभे राहीले असुन त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, अशी मागणी होत आहे. शाळा सुरू होण्यास अवघा कांही दिवसांचा कालावधी शिल्लक राहीलेला असतानाही या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहीले जात नसल्याबदल कर्मचा-यांमधुन चर्चिले जात आहे. बदल्यांचे आदेश मिळुनही अद्याप न सोडण्यात आल्यामुळे कर्मचा-यांचा जीव टांगणीला लागला आहे.
सोलापूर जिल्हयातील पोलिस कर्मचा-यांच्या बदल्यासंदर्भात 31 मे 2014 रोजी जिल्हा पोलिस दलातर्फे संगणकावर ई-मेल संदेशाद्वारे आदेश काढुन त्यांना बदल्यासंदर्भात आदेश काढुन कार्यमुक्त करण्याचे बजावण्यात आले आहे. बदल्यांचे आदेश काढुन दहा दिवसांचा कालावधी उलटुन जावुनही स्थानिक अधिका-यांनी वरिष्ठांचे लेखी आदेश न मिळाल्याचे भांडवल करत बदली झालेल्या कर्मचा-यांना अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही.
शाळा सुरू होण्यासाठी खुपच कमी कालावधी शिल्लक असुन जिल्हयातील बदली झालेल्या 474 पोलिस कर्मचा-यांना जुन्या नौकरीच्या गावातुन नविन ठिकाणी बदलुन गेल्यानंतर त्यांच्या निवास्थानापासुन पाल्यांचे शालेय प्रवेश आदी विविध प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र जिल्हयातील अधिकारी दुस-या कोणत्या तरी पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांना अगोदर सोडु द्या, आम्हीही तुम्हाला लगेच सोडतो, असे बोलताना दिसत आहेत. तरी जिल्हयाच्या वरिष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष घालुन कार्यवाही करावी अशी कर्मचा-यांमधुन बोलले जात आहे.