तेर : इतर ठिकाणच्या संताच्या भुमिचा विकास झाला पाहिजे त्याच धर्तीवर तेर येथील श्रीसंत गोरोबा काका यांच्या पवित्र भुमिच्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे प्रतिपादन जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून गीनिज बुकात नोंद झालेली ज्योती आमजे यांनी केले.
    तेर तालुका उस्मानाबाद येथे माजी सांस्कृतिक राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी या घराचा गत वैभवासाठी २५ लाख निधी मंजुर केला होता. त्या निधीतून हे घर राज्य संरक्षीत घर म्हणून जाहीर केले होती. श्रीसंत गोरोबा काका यांच्या नुतन घरामध्ये गृह प्रवेश करण्याच्या कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी ज्योती आमजे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रजापती कुंभार महासंघाचे उपाध्यक्ष विठ्ठल राऊत होते. यावेळी अखिल भारतीय प्रजापती कुंभार महासंघाचे अध्यक्ष अशोकराव सोनवणे, गोवा प्रदेश अध्यक्ष सलमान हरमाळकर, कोल्हापुरचे माजी महापौर, मारुतीराव कातुरे, राज्य उपाध्यक्ष गुडाप्पा कुंभार, पत्रकार महादेव कुंभार, युवक प्रदेश अध्यक्ष मोहन जगदाळे, तेरणा कारखान्याचे संचालक सतिश सोमाणी, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    पुढे बोलताना ज्योती आमजे म्हणाल्या की, श्री संत गोरोबा काका आमजे यांच्या पवित्र भुमित उद्घाटनाच्या निमित्त येण्याचा योग आला. यामुळे मी धन्य झाले असे भावनोग्दार काढले. सर्वप्रथम पुराणवस्तु संग्रहालयापासुन श्रीसंत गोरोबा काका यांच्या घरापर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली. याठिकाणी ज्योती आमजे यांच्या हस्ते फित कापून गृहप्रवेश करण्यात आला.
    यावेळी माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंभार संघटनाचे जिल्हा संघटक महादेव खटावकर यांनी केले तर सुत्रसंचालन रामदास कुंभार यांनी केले. आभार नागनाथ कुंभार यांनी मानले. यावेही जिप सदस्या किर्तीमाला खटावकर, संयोजनीदेवी राजे निंबाळकर, अविनाश इंगळे, बाशीद काझी, बालाजी बंडगर, राजाभाऊ आंधळे व मोठ्या संख्येने कुंभार समाज बांधव उपस्थित होते.
 
Top