नळदुर्ग :- पदवीधरांच्‍या प्रश्‍नाची सोडवणूक करण्‍यासाठी मराठवाडा पदवीधर मतदार संघात परिवर्तन करण्‍याचे आवाहन महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी अणदूर (ता. तुळजापूर) येथे दि. 10 जून रोजी पदवीधरांच्‍या बैठकीत बोलत होते.
    यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्‍य संजय निंबाळकर, संघटन मंत्री अविनाश कोळी, जिल्‍हा सरचिटणीस प्रभाकर मुळे, सचिन देशमुख, अॅड. खंडेराव चौरे, श्रीमंत मुळे, दत्‍ता राजमाने, सुशांत भूमकर, विजय शिंगाडे, साहेबराव घुगे, संजय आलुरे, शिवसेनेचे विभागप्रमुख मनोज कस्‍तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्‍वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली. याप्रसंगी संजय निंबाळकर यांनी देशात जनतेने परिवर्तन घडवून आणले असून आता प्रज्ञावंत मतदार बंधूनीही या निवडणुकीतही परिवर्तन घडवून आणावे, असे आवाहन केले. यावेळी नितीन काळे, अविनाश कोळे यांचेही भाषण झाली. बैठकीस गुंडेशा गोवे, शाहूराज मोकाशे, दादा घोडके, शिवकुमार स्‍वामी, दिपक घुगे, किशोर पुजारी, अमोल गुड्ड, वसंत सदाफुले, सोमनाथ बनसोडे यांच्‍यासह शंभर पदवीधर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचान व आभार साहेबराव घुगे यांनी केले.
 
Top