उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे मार्फत सप्टेंबर/ऑक्टोंबर-2014 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेतंर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत.
    विद्यार्थ्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्कासह बुधवार,दि.25 जून,2014 पर्यंत आणि शाळा /कनिष्ठ महाविद्यालयाने चलनाच्या प्रतीसह व विद्यार्थ्यांच्या यादीसह मंडळाकडे सादर करण्याची तारीख सोमवार,दि.30 जून,2014 ही राहील तर विलंब शुल्कासह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पध्दतीने दि.26 जून ते 02 जुलै,2014, शाळा /कनिष्ठ महाविद्यालयाने चलनाच्या प्रतीसह व विद्यार्थ्यांच्या यादीसह मंडळाकडे सादर करण्याची तारीख शनिवार, दि.05 जुलै,2014 अशी राहील.
        तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह सर्वांनी सप्टेंबर/ऑक्टोंबर-2014 आवेदनपत्रे भरतांना ऑनलाईन,त्याचप्रमाणे ऑफलाईन भरुन अपलोड करण्याची सुविधा आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या परीक्षा (फेब्रु/मार्च,2014) मधील माहिती वर्ष, महिना आणि बैठक क्रमांक टाकल्यानंतर मागील परीक्षेची सर्व माहिती ऑनलाईन आवेदनपत्रात उपलब्ध होणार आहे. सप्टेंबर/ऑक्टोबर परीक्षेस संख्या अल्प असल्याने ती माहिती ऑफलाईन न भरता ऑनलाईन भरावी.
    सदर परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून एका पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
 
Top