वैराग (महेश पन्हाळे) -: ज्याला आकार, उकार, काना, मात्रा नाही शरीरात ज्याची जागा माहित नाही. पण जे अज्ञाना कडून ज्ञानाकडे जाण्याचा जो प्रवास आहे. त्याप्रवासात भक्कम साथ देणारे इंद्रिय म्हणजे मन असे प्रतिपादन ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांनी येथे आयोजित श्री संतनाथ प्रवचन मालेत मन करा रे प्रसन्न याविषयावर पहिले पुष्प गुंफताना केले.
गेल्या तीन वर्षा पासून संत माणकोजी बोधले महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त शिवाजीनगर येथे श्री संतनाथ प्रवचन माला सुरु करण्यात आली आहे. तिसया वर्षाच्या प्रवचन मालेची सुरुवात ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, जेष्ठ साहित्यिक प.ना. कुलकर्णी यांच्या हस्ते ग्रामदैवत संतनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
याप्रसंगी पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की माणूस इथ येतो इथ माझ काय आहे आणि माझ काय नाही याचा विचार करता मी आणि माझ या ओदन शब्दात माणसचा जीवन व्यापून गेलेलं आहे . एकतर कोणत्याही गोष्टीत माणसाचा मी आलेला असतो . आणि माझ माणसचा आलेलं असत या दोन गोष्टीने माणूस आपली समाजाला ओळख करून देत असतो . पण मी कोण याचीच ओळख माणसाला नसते .माणसा वर नातेवाईक , मित्र ,आप्त ,स्वकीय यांच्या सर्वांचा अधिकार असतो .कारण सार्वजन म्हणतात माझा मुलगा, माझा भाऊ, माझा मित्र पण मी कोण याचीच ओळख माणसाला नाही. पण माणसाच मन हे सर्वोच्च आहे कारण ते माणसाला अज्ञाना कडून ज्ञानाकडे घेवून जात असत . म्हणून माणसान स्वताला ओळख्याला शिखल पाहिजे . असे प्रतिपादन शेवटी बोधले यांनी केले.