उस्मानाबाद -: नुतन उपविभागीय अधिकारी शोभा राऊत या परभणी येथून बदली होऊन उस्मानाबाद येथे उपविभागीय अधिकारी म्हणून दि.12 जून रोजी रुजू झाल्या आहेत. येथील उप विभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांच्याकडून त्यांनी या पदाचा पदभार स्विकारला. प्रशांत सुर्यवंशी यांची याच पदावर सेलू जि.परभणी येथे बदली झाली आहे. 
        शोभा राऊत हया  परभणी येथे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) या पदावर कार्यरत होत्या.
    यावेळी उस्मानाबादचे तहसीलदार  सुभाष काकडे, तुळजापूरचे तहसीलदार श्री. पाटील, शहर पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक घुगे, अॅड. हराळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार नाना कदम यांनी केले.
 
Top